माय मराठी 3

  • Author: PROF. DEEPALI ATISH SOSE & ATISH SOSE
  • ISBN: 978-81-967318-1-6
  • Binding: Paper Back
  • Availability: In Stock
  • Edition: 2024

आपल्या महाराष्ट्र राज्याची मातृभाषा ही ‘मराठी’ आहे. भाषा ही आपण आपली जननी मानतो. त्या अर्थाने या पुस्तकाचे नाव प्रारंभी ‘अभिजात मराठी’ असे ठेवण्यात आले होते; आणि याच पुस्तकाची सुधारित आवृत्ती ही ‘माय मराठी’ या नावाने नव्या बदलांसह, नव्या स्वरुपात प्रकाशित केली आहे.
विद्यार्थ्यांचा भाषिक, आंतरिक, सामाजिक, भावनिक, नैतिक, सांस्कृतिक, कलात्मक विकास व्हावाच; त्यासोबतच त्यांच्यात संवेदनशीलता, सहृदयता, करुणा, धैर्य, चिकाटी, रचनात्मक कल्पनाशक्‍ती, सहानुभूती, सहनशीलता अशी सर्व अत्यावश्यक मूल्ये रुजावी, यासाठी त्या अनुषंगाने पाठ, कविता व नाट्यछटांसह इतर अभ्यासही देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.