आपल्या महाराष्ट्र राज्याची मातृभाषा ही ‘मराठी’ आहे. भाषा ही आपण आपली जननी मानतो. त्या अर्थाने या पुस्तकाचे नावही अगदी त्याच उंचीचे असायला हवे, म्हणून या पुस्तकाचे नाव ‘अभिजात मराठी’ असे ठेवण्यात आले आहे.
अभिजात भाषा म्हणजे चिरकाल टिकणारी, काळाच्या ओघात त्याच्या स्वरुपात बदल न होणारी आणि अलौकिक सौंदर्य लाभलेली कुलीन, सुसंस्कृत, उच्च, सभ्य भाषा होय.
विद्यार्थ्यांचा भाषिक, आंतरिक, सामाजिक, भावनिक, नैतिक, सांस्कृतिक, कलात्मक विकास व्हावाच; त्यासोबतच त्यांच्यात संवेदनशीलता, सहृदयता, करुणा, धैर्य, चिकाटी, रचनात्मक कल्पनाशDrh, सहानुभूती, सहनशीलता अशी सर्व अत्यावश्यक मूल्ये रुजावी, यासाठी त्या अनुषंगाने पाठ, कविता व नाट्यछटांसह इतर अभ्यासही देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.